Akshardhara Book Gallery
Maya (माया)
Maya (माया)
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 162
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
माया
कुठल्याही कलाकृतीची सुरुवात ही एका ठिणगीपासून होते. तेव्हा कथाबीज वगैरे नसतेच. फक्त एक तीव्र जाणीव असते, कलाकृतीच्या अस्तित्वाची. ती फक्त लेखकच जाणू शकतो. मिलिंद ढेरे यांच्या एका फोटोने 'माया'ची ठिणगी पडली. एका जुन्या वाड्याच्या बंद दरवाजाचा आणि त्या दरवाजाच्या कलत्या भिंतींचा तो फोटो होता. माया म्हणजे वळणांचा रस्ता. प्रत्येक वळण एक अंदाज न लावता येणारा धक्का. मायाचे जगणे इतके गुंतागुंतीचे आहे की, अंदाज बांधणं अशक्य. शेवटी स्त्री कळायला स्वतःमध्ये सुद्धा एक स्त्री जोपासायला लागते. सर्वसाधारण स्त्रिया सहन करतात पण बोलू शकत नाहीत... ते माया सहज सांगून जाते.... मनू, माया, शुभदा, निलू.... सगळ्यांशी गप्पा माराव्यात असे वाचकाला वाटत राहते. फार सुंदर व्यक्तिचित्रणे... एकेका प्रकरणात त्या त्या व्यक्तीचे चित्र मनात पूर्ण होते. मनू खरे तर इथे निवेदक किंवा थर्ड पर्सन म्हणून जाणवते... तिच्याशी रीलेट होते का माया?.. तिला नेमके या स्त्रीबद्दल काय वाटते? अभिमान..प्रेम.. माया की निव्वळ औत्सुक्य..? अर्थात् 'माया' संपूर्ण उमजणे कठीणच पण अपूर्णतेतून ती वाचकाला खिळवून ठेवते नजरबंदीने...... आयुष्याच्या एका वळणावर एक शोध आणि त्या मागची खळबळ निमावी, आणि शांत मनाने नवी सुरुवात व्हावी हे वाचकाला खूप भावते !
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन .
