Mazi Jeevangatha (माझी जीवनगाथा) By Prabodhankar Thackeray
Mazi Jeevangatha (माझी जीवनगाथा) By Prabodhankar Thackeray
Share
Author:
Publisher:
Pages: 535
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Mazi Jeevangatha (माझी जीवनगाथा)
Author : Prabodhankar Thackeray
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी, आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकवट व्हावे, या कल्पनेने डॉ. आंबेडकर अगदी पछाडले होते.
डॉक्टर म्हणाले, "हे पाहा ठाकरे, सध्या निरनिराळ्या पक्षांतून विस्तव जाईनासा झाला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी काँग्रेसवाले तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चुकूनही देणार नाही. आपापल्या ध्येयाची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील, तर त्यात माझा शेड्यूल्ड क्लास अगत्य भाग घेईल. माझा शेड्यूल्ड क्लास जिब्राल्टरसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील." मी : मी हे जाहीर करू का? डॉ. : अगत्य करा. डॉ. आंबेडकरांची मुलाखत मी प्रसिद्ध केली नि त्याचा परिणाम अनुकूल झाला. सारे पक्ष समितीत एकवटले. - प्रबोधनकार ठाकरे