Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mendula Khurak (मेंदूला खुराक)

Mendula Khurak (मेंदूला खुराक)

Regular price Rs.100.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.100.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sucheta Sane

Publisher: Sucheta Vidyadhar Sane

Pages: 40

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Brain Tonic for Students

मनोरंजक 

मेंदूला खुराक 

श्रीमती सुचेता साने एक सुजाण वाचक आणि बहुआयामी लेखिका आहेत. माझ्या अनुभवातून 
सांगते बुध्दिमान आणि लाघवी व्यक्तिमत्व असलेल्या सुचेता, मुळापासून उत्साही, नेहमीच 
काहीतरी नवीन करण्याची उर्मी असणाऱ्या शिक्षिका आहेत. खास मराठी भाषाप्रेमी असणाऱ्या 
त्यांचे हे पुस्तक मुलांच्या मनात विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी एक बीज पेरते. 
वाचन फक्त मार्कांसाठी न करता मनोरंजनासाठी सुध्दा करता येते असे हे पुस्तक सांगते. 
अभ्यासातून थोडा वेळ मन तणावमुक्त होण्याचा मार्ग मिळतो.

आयुष्यातील ज्ञान आणि अध्यापनातील दीर्घ अनुभवाने त्यांनी या प्रत्येक कथेत उपयुक्ततेची 
संकल्पना आणली आहे. हितोपदेश / पंचतंत्रातील कथा हया आजूबाजूच्या समाजातील सध्याच्या 
परिस्थितीशी जोडण्याचा विशेष प्रयत्न हे या पूस्तकाचे वैशिष्टय आहे. केवळ पुस्तक वाचून 
माणूस शहाणा होत नाही, तर त्यामागील शिकवण खरोखर समजून घेऊन आणि त्याचा 
स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन शहाणा होतो.

एक आयुर्वेदिक डॉक्टर आणि mind- body wellness सल्लागार म्हणून मला वाटते 
की कथा वाचल्यानंतर मुलांनो, तुमच्या मनात असे प्रश्न यावे की, “जर हया जागी मी 
असतो/ असते तर काय केले असते ? हया कथेतून मला काय समजले ? ” मला खात्री 
आहे की स्व-इच्छेने दिलेली उत्तरे आश्चर्यचकित करणारी असतील.. प्रत्येक कथेखालील 
हे प्रश्न मुलांच्या अंतर्मनाला नैसर्गिक, मैत्रीपूर्वक आणि विचारपूर्वक पध्दतीने प्रश्न 
सोडवण्यास प्रवृत्त करतील.

अतिशय सोप्या भाषेतील कथांद्वारे प्रत्येक मुलाच्या मेंदूत विश्लेषण आणि स्वतःचे मत 
व्यक्त करण्याचे बीज रोवण्याचे अद्भुत काम सुचेता साने यांनी केले आहे. याचा लाभ 
पालक-शिक्षक आपल्या मुलांना करुन देतील अशी मला खात्री आहे.
यासाठी अनेक शुभेच्छा....!!

लेखक : सुचेता साने 
प्रकाशक : सुचेता विद्याधर साने 

View full details