Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mithkānpāsūn Vijñānāparyant (मिथकांपासून विज्ञानापर्यंत)

Mithkānpāsūn Vijñānāparyant (मिथकांपासून विज्ञानापर्यंत)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Gauhar Raza

Publisher: Madhushree Publication

Pages: 224

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Vikram

मिथकांपासून विज्ञानापर्यंत

विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे विरोधक आहेत की एकमेकांना पूरक ? एक अत्यंत धार्मिक व्यक्ती, चांगली वैज्ञानिक असू शकते का? विज्ञान हे लोकांना धर्मभ्रष्ट करतं का? एखाद्या अत्यंत धार्मिक समाजात, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू शकतो का ?

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असलेल्या, कवीमनाच्या गौहर रझा ह्यांच्यासमोरसुद्धा हे प्रश्न अनेकदा उपस्थित झाले. कधी कुंभमेळ्याच्या गर्दीत, तर कधी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना. ह्यांपैकी काही प्रश्न आपल्याला विज्ञानाकडे आणि काही धर्माकडे घेऊन जातात. ह्या प्रश्नांची उत्तरं एका कवीमनाच्या वैज्ञानिकाने शोधायला सुरुवात केली, तेव्हा मिथकं आणि कहाण्यांबरोबरच धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि विज्ञानाचे अनेक पैलू पुढे आले.

हे पुस्तक ब्रह्मांडाच्या आणि जीवसृष्टीच्या विकासाची बदलती कहाणी सांगताना ‘विज्ञाना’ची व्याख्या करण्याचा एक प्रयत्न आहे. इतिहासाची पानं उलटत-उलटत यात सांगितलं गेलंय, की विज्ञान आणि धर्म ह्यांच्यामध्ये ‘वास्तविकते’ची सीमारेषा आखणं आवश्यक आहे. ही गोष्टसुद्धा पावला-पावलांवर स्पष्ट होत जाते, की तार्किक दृष्टी, वैज्ञानिक पद्धती आणि मानवी संवेदना या परस्परपूरकच आहेत.

लेखक : गौहर रझा 
प्रकाशन :  मधुश्री पब्लिकेशन 

View full details