Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mrutyu Nantarche Jivan (मृत्यू नंतरचे जीवन)

Mrutyu Nantarche Jivan (मृत्यू नंतरचे जीवन)

Regular price Rs.175.50
Regular price Rs.195.00 Sale price Rs.175.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Raymond Moody

Publisher: Wow Publishings Pvt Ltd

Pages: 178

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मृत्यू नंतरचे जीवन 

मृत्यूसंबंधी आपण प्राप्त केलेले ज्ञानच आपल्या जीवनपद्धतीला महत्वाचे परिणाम देते. शारीरिक मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे हे पुस्तक सर्वप्रथम १९७५ साली प्रकाशित झाले आणि त्याच्या लोकप्रियतेत आजवर खंड पडलेला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पुन्हा जीवनात परतलेल्या १०० लोकांचा अतिशय उत्कंठावर्धक, अत्यंत वाचनीय असा हा विलक्षण अभ्यास आहे. ह्या सर्वजणांनी सांगितलेल्या मृत्यूच्या समीपच्या अनुभवांमध्ये कमालीचा सारखेपणा आहे. हे अनुभव इतके सकारात्मक आहेत की ते वाचल्यानंतर आपलं जीवन, मृत्यू आणि त्यानंतरचे आत्मिक/आध्यात्मिक जग यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. 'मी तरंगत असल्याचं मला जाणवलं... मी वळून पाहिलं आणि खाली अंथरूणावर पडलेलं माझं शरीर मला दिसलं.' 'तिथे वेदनेचा मागमूसही नव्हता, आणि इतकं मोकळं, तणावरहीत यापूर्वी मला कधीच वाटलं नव्हतं खूपच छान होतं सगळं' 'अतिशय शांतता आणि नीरवतेची भावना व्यापून राहीली आणि माझ्या लक्षात आलं की मी एका बोगद्यातून जात आहे' 'खूपच उबदार भावना होती ती... आजवरची कधी न अनुभवलेली अत्यंत सुखकारक अवस्था मी अनुभवत होते.' ज्यांची प्रिय व्यक्ती काळानं हिरावून नेली आहे किंवा ज्यांना मृत्यू या घटिताविषयी उत्सुकता आहे अशा सर्वांसाठी 'जीवनानंतरचे जीवन' एक नवं दालन खुलं करते... एक प्रकारचा विश्वास मनात जागवतं.

लेखक. रिमांड ए. मूडी 
प्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स

View full details