Akshardhara Book Gallery
Mukti Kon Pathe ? (मुक्ती कोण पथे ?)
Mukti Kon Pathe ? (मुक्ती कोण पथे ?)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Babasaheb Ambedkar
Publisher: Vinimay publication
Pages: 40
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मुक्ती कोण पथे ?
माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा
संघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा
समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा
स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा
संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा
जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?
जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?
जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?
जो धर्म तुम्हाला शिक्षण मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ?
जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?
जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?
ज्या धर्मात माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे !
ज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे !
जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये असे सांगतो, तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे.
जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा, अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे
लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर
प्रकाशक. विनिमय पब्लिकेशन
