Akshardhara Book Gallery
Mulanche shikshan : palak va shasan (मुलांचे शिक्षण : पालक व शासन)
Mulanche shikshan : palak va shasan (मुलांचे शिक्षण : पालक व शासन)
Couldn't load pickup availability
Author: Pra.ramesh panse
Share
Publisher: Diamond Publications
Pages: 130
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मुलांचे शिक्षण : पालक व शासन
शिक्षणविषयी सार्वत्रिक असमाधान तर आहेच. किंबहुना म्हणूनच तर ते नाकारण्याचा आणि त्याच्याजागी पर्यायी शिक्षण उभे करण्याचा परिवर्तनवादी विचार आता होऊ लागला आहे. पण, हा एकच प्रश्न नाही. आणखीही काही मोठे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, शिक्षण सर्वांनाच मिळत नाही. शिक्षणाची संधी आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे सर्वांना सामावून घेत नाही. शिक्षणवंचितांचा मोठा वर्ग असणारा असा आपला देश आहे. ज्यांना शिक्षणाची संधी मिळते त्यांना ती समानतेने मिळत नाही, हे घटनेच्या जाहीरनाम्यात समतेचा उद्घोष करणाऱ्या राष्ट्रातील सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. एके काळी सामाजिक वर्गवारीनुसार शिक्षणाची संधी असायची तर आता प्रामुख्याने आर्थिक वर्गवारीनुसार. शिक्षण ही एक विक्रेय वस्तू, म्हणूनच ठरविली गेली, आणि सरकारी शिक्षण खात्याचे रूपांतर मानवी संसाधन खात्यात केले गेले, त्यामुळे शिक्षणाचा प्रत्यक्ष संबंध ग्राहकाच्या खरेदीशक्तीशी बांधला गेला. बाजार हा नेहमीच असमता निर्माण करतो, हे आपण या बाबतीत ध्यानात घ्यायला हवे आहे. संधीची व दर्जाची समानता है अजूनही क्षितीजाच्या पलीकडील ध्येय आहे.
आपले आजचे शिक्षण असमाधानकारक आहे, असे वेगवेगळ्या कारणाने, पण प्रत्येकजणच म्हणत असतो. शिकताना, शिकणाऱ्यांना त्यात रस वाटत नाही. जीवनात ते उपयुक्त ठरत नाही, असा अनुभव सार्वत्रिक आहे. शिक्षणाने व्यक्तीला आयुष्यभरासाठीची ज्ञान, मूल्ये, कौशल्ये आणि प्रश्न सोडविण्याची ताकद द्यायची असते. आजचे शिक्षण हे असे नाही, अशी भावना जर सार्वत्रिक असेल तर सार्वत्रिकरीत्याच ते नाकारले गेले पाहिजे. त्यासाठी राज्यव्यापी आणि राष्ट्रव्यापी आंदोलन छेडले गेले पाहिजे.
लेखक : प्रा.रमेश पानसे
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स
