Akshardhara Book Gallery
MUMBAICHA VAIBHAVSHALI VARSA (मुंबईचा वैभवशाली वारसा)
MUMBAICHA VAIBHAVSHALI VARSA (मुंबईचा वैभवशाली वारसा)
Share
Couldn't load pickup availability
Author: MADHUKAR DHAVALIKAR
Publisher: APRANT PRAKASHAN
Pages: 176
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:-----
मुंबईचा वैभवशाली वारसा
मुंबई ही आज जरी भारतीबांची स्वप्ननगरी असली तरी अतीप्राचीन काळी इथे येण्यास माणूस तयार नव्हता. रोज येणान्या भरतीमुळे ही सात बेटांची भूमी म्हणजे दलदलीचा, रोगराईचा प्रदेश होता. कोणीही ब्रिटिश अधिकारी तेथे येण्यास नाखुश असे. पोर्तुगीजांना तर ती नकोच होती. खरे म्हणजे त्यांनी ह्या बेटांना नकोशी बेटे नाव द्यावयास पाहिजे होते. पोर्तुगीजांनी ती इंग्रज राजाला लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली. पण त्यात त्यांचे औदार्य नव्हते, उलट ह्या घाणीतून आपण सुटल्याचा सुस्कारा त्यांनी त्यावेळी टाकला असावा. हे सारे तीनशे वर्षांपूर्वी घडले बावर आता विश्वास बसत नाही. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून ह्या दलदलीच्या बेटांचे नशीब पालटण्यास सुरुवात झाली आणि थोड्याच काळात, सुरवंटाचे जसे फुलपाखरु होते, तसे त्यांचे स्वप्ननगरीत रूपांतर होण्यास सुरुवात झाली. व्यापार वाढू लागला तशी लोकसंख्या वाढू लागली आणि अजूनही ती वेगाने वाढत आहे. इ. स. १७६१ मध्ये मुंबईची लोकसंख्या ६०००० होती, ती चार वर्षात ६५०००च्या वर गेली. तिचा कायापालट अश्मयुगात येथे मानव अवतरल्यापासून आजच्या अणूयुगांपर्यंत कसा झाला याचा कहाणी मोठी मनोरंजक आहे.
लेखक : डॉ मधुकर केशव ढवळीकर
प्रकाशन : अपरांत प्रकाशन
