Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Naakohus (नाकोहस)

Naakohus (नाकोहस)

Regular price Rs.117.00
Regular price Rs.195.00 Sale price Rs.117.00
40% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Purushottam Agrawal

Publisher: Mehta Publishing House

Pages: 138

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sunita Devsthali

नाकोहस 

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अनेक बाबतीत पाहता पाहता जग खूप बदलत गेलं. ऊठसूट कोणीही 'आमच्या भावना दुखावल्या' गेल्याचं भांडवल करून आपलं घोडं पुढे दामटत असतं. गुंडगिरी करून आपल्या मनाप्रमाणे करून घेत असतं. मतांचं राजकारण खेळत राजकारणीसुद्धा अशांना पाठीशी घालत असतात. प्रसारमाध्यमं छोट्या छोट्या गोष्टींना मोठं रूप देऊन दिवसभर त्यावरच पाल्हाळ लावत बसतात.

त्या दिवसभराच्या प्रसारित होणाऱ्या प्रकाश-झोतासाठी आसुसलेले लोक विनाकारण समाजात कुरापती काढत असतात. तत्त्वानं वागणारे, बुद्धीच्या कसावर जग पारखणारे, खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे जगू पाहणारे, आपल्यासारख्या निधर्मी देशात निर्मळ मनानं, खरोखरीच धर्मसहिष्णुतेनं राहू पाहणारे मात्र या अशा वातावरणात भरडले जातात, हे आजच्या काळातलं वास्तव. हेच वास्तव सुकेत, रघू आणि शम्स या तीन भिन्न धर्माच्या तरीही वैचारिक साम्य असलेल्या बुद्धिजीवी मित्रांच्या माध्यमातून पुरुषोत्तम अग्रवाल यांनी अधोरेखित केलं आहे 'नाकोहस' या व्यंगात्मक कादंबरीतून.

लेखक : पुरुषोत्तम अगरवाल 
अनुवाद : सुनीता देवस्थळी 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details