Akshardhara Book Gallery
Naina (नैना)
Naina (नैना)
Couldn't load pickup availability
Author: Dr Subhash Yashvantrao Pawar
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
नैना
प्रेम, विश्वास, वेदना, मैत्री आणि उभारी- एका स्त्रीच्या पुनर्जन्माची ही कहाणी. प्रेमळ व यशस्वी पतीच्या जयकिशनच्या आकस्मिक मृत्यूनंतर, नैना एका क्षणात कोसळते. एका मुलीची आई, एक उद्योजिका, एक तरुण विधवा- सगळ्या भूमिका तिच्यावर कोसळतात. तत्क्षणी ती मोडते... कोसळते... आणि पुन्हा उभीही राहते. ते फक्त स्वतःसाठी नाही - तर तिच्या प्रेमाच्या, तिच्या स्वप्नांच्या, आणि एका संपूर्ण समाजाच्या आशांसाठी. अमृतसोबतची तिची चूक तिला एका धोकादायक वळणावर नेते, पण तिची बालमैत्रीण असलेल्या सोनाच्या एका निर्णायक हस्तक्षेपाने नैना पुन्हा स्वतःला शोधते. जिथे पाप नाही, पण चूक असते व आहे देखील... आणि जिथे चूक सुधारण्यासाठी एक मैत्रीण उभी राहते... तिथेच नैना दुसरा जन्म घेते. व्यवसाय, समाजसेवा, मूल्य, धैर्य, मातृत्व आणि मानवी कमकुवतपणा-या सर्वांच्या संगमातून फुललेली, एक स्त्री स्वतःच्या राखेतून पुन्हा उभी राहते, आणि आकाशाच्या उंचीला भिडते. ही कादंबरी फक्त एका स्त्रीची कथा नाही- ही प्रत्येक एका स्त्रीची विजयगाथा आहे. ही जीवनाने पुन्हा दिलेल्या सुवर्णसंधीची कहाणी आहे. आणि ही आहे - नैना ! एक अशी कहाणी जी हृदयात दीर्घकाळ धगधगत राहील.
लेखक. डॉ सुभाष य. पवार
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन्स
