Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

NAMBARI MANAS (नंबरी माणसं)

NAMBARI MANAS (नंबरी माणसं)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: PRABHAKAR NILEGAONKAR

Publisher: PRABHAKAR NILEGAONKAR

Pages: 108

Edition: 2025

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

NAMBARI MANAS    (नंबरी माणसं)

एक हरहुन्नरी एकपात्री कलाकार म्हणून प्रभाकर निलेगांवकर हे आपल्याला परिचित आहेत. परंतु ते एक उत्तम लेखकही आहेत हे अनेकांना माहीत नाही. आपल्या तीन पुस्तकांनंतर आता ते 'नंबरी माणसं' हा व्यक्तिचित्रांचा संग्रह घेऊन आपल्यासमोर येत आहेत.
ही व्यक्तिचित्रं वलयांकित किंवा प्रथितयश व्यक्तींची नाहीत, तर सर्वसामान्य पण वैशिष्ठ्यपूर्ण अशा माणसांची ही चित्रं आहेत. आपल्या चाकोरीतल्या जीवनात न भेटणाऱ्या माणसांची निलेगांवकर आपल्याला ओळख करून देतात. बँकेतल्या नोकरीमुळे सतत होणाऱ्या, बदल्या त्यामुळे एसटीने आणि रेल्वेने करावा लागणारा प्रवास याचा त्यांना खूप फायदा झाला. विलक्षण अनुभव आणि चमत्कारिक माणसं त्यांना भेटत गेली, निलेगांवकर हे एकपात्री कलाकार आहेत. एकपात्री कलाकारापाशी उत्तम अभिनयाबरोबरच सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि माणसांची बारीक सारीक वैशिष्ट्यं टीपकागदासारखं टिपण्याचं कौशल्य लागतं, ते निलेगावकरांपाशी भरपूर आहे. त्यामुळे एखाद्या लहानशा घटनेतून किंवा प्रसंगातून त्यांनी ठसठशीत चित्रं उभी केली आहेत. ती वाचताना आपली छान करमणूक होते. घटनेच्या अनुषंगानं येणारा भवताल आणि निसर्ग याचं वर्णनही ते जसं छान करतात तसंच त्या प्रसंगात येणाऱ्या अन्य व्यक्तीही ते साक्षेपानं रंगवतात. चित्रकलाही त्यांना अवगत असल्यामुळे लेखाला सनुरूप अशी त्यांची चित्रंही परिमाणात भर घालतात.
निलेगांवकरांच्या नंबरी माणसांचं वाचक स्वागत करतील याची मला खात्री आहे.

लेखक: प्रभाकर निलेगांवकर 

View full details