Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nangaracha Ghav (नांगराचा घाव)

Nangaracha Ghav (नांगराचा घाव)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Digambar Devadhe

Publisher: Shabdalay Prakashan

Pages: 104

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नांगराचा घाव 

हे केवळ कवितांचं पुस्तक नाही; ही मातीत रुतलेल्या पायांची, फाटलेल्या तळव्यांची आणि करुणार्त हातांची कहाणी आहे. नांगराच्या प्रत्येक घावातून उसळलेली वेदना, विहिरीच्या तळाशी साचलेली आशा, बैलांच्या डोळ्यात दाटलेला इतिहास आणि शेतकऱ्याच्या काळजात खोल रुतलेला पीळ — हे सगळं या कवितांमध्ये जिवंत झालं आहे. इथे माती बोलते. आभाळ कधी देव तर कधी गुन्हेगार ठरतं. पाऊस आशा देतो आणि कधी अवकाळी होऊन लुटूनही नेतो. पण तरीही - भेगाळलेल्या भुईतून अंकुर फुटतो, उन्हातून सावली जन्माला येते आणि निराशेच्या धुळीतून नवी पेरणी उभी राहते.

घाम, अश्रू आणि जिद्दीने पेरलेली, आशेच्या सूर्यप्रकाशात उगवलेली ही शब्दांची शेती आहे. ज्यांनी रान अनुभवलं त्यांना यात स्वतःचं प्रतिबिंब दिसेल, पण ज्यांनी अनुभवलं नाही त्यांना 'नांगराच्या घाव' मधील वेदना एकदा ऐकावीच लागेल.__प्रकाश होळकर 

लेखक : दिगंबर देवढे 

View full details