Akshardhara Book Gallery
NANOSHELL (नॅनोशेल)
NANOSHELL (नॅनोशेल)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Sanjay Dhole
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 176
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
NANOSHELL (नॅनोशेल)
डॉ. संजय ढोले हे आत्ताच्या मराठी विज्ञान साहित्यातील आघाडीचं नाव. त्यांनी विज्ञानकथांसोबतच विज्ञानकादंबरी व इतर विज्ञानलेखनाचेही प्रकार हाताळलेले आहेत. मुख्यत्वे आता त्यांच्या विज्ञानकथा या प्रचलित असून, जनमानसात चांगल्याच रूढ झालेल्या दिसतात. विज्ञानकथांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विज्ञान प्रसार करण्याचा त्यांचा हेतू साध्य तर झालाच; पण त्याच वेळी रूढी-परंपरा धरून चालणाऱ्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांच्या विज्ञानकथांनी केल्याचं आढळलं आहे. प्रस्तुत ‘नॅनोशेल' हा विज्ञानकथासंग्रह त्याच पठडीतील असून, विज्ञानांचा विविध आविष्कार त्यांच्या या विज्ञानकथा घेऊन येतात.
यात मुख्यत्वे ‘स्वल्पविराम' ही कथा
संगणक व रोबोटिक्सचा आढावा घेणारी असून, 'कोण आहे तिथे' ही प्रवेगक, ‘बोअरवेल' ही नाभिकीय इंधन, ‘विक्षिप्त जनुक' ही मानवी जीनोम, 'घात' ही मशीनलर्निंग व फजीलॉजिक, ‘शेवटचे क्षण' ही किरणचिकित्सा, ‘मोलस्टेशन' ही रेडिओस्रोत तर ‘नॅनोशेल' ही कथा अतिसूक्ष्म पदार्थ, ‘स्वॅब’ ही विषाणूंसंदर्भात असून, 'चेहरा' ही डीपलर्निंग, डेटाबेस तर 'समर्पण' ही कोरोना विषाणू व 'कोअर शेल' ही कथा ग्राफाइट या पदार्थांच्या नॅनोकणांवर आधारित असून अशा विविध विज्ञानकल्पना आल्या आहेत. खरंतर या एकविसाव्या शतकातील विज्ञानकथा असून त्यातील विज्ञान भविष्यातील तंत्रज्ञानाची चुणूक दाखवणाऱ्या आहेत.
लेखक: डॉ. संजय ढोले
