Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Neelkanth (नीलकंठ)

Neelkanth (नीलकंठ)

Regular price Rs.168.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.168.00
40% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Snehal Joshi

Publisher: Mehta Publishing House

Pages: 222

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नीलकंठ 

जीवनप्रवासाच्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात. निव्वळ चेहऱ्यावरून तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच! व्यक्ती-व्यक्तींमधले परस्परसंबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण तह, भावनांचे कंगोरे आणि कळत-नकळत उफाळणारे तरंग या साऱ्याचा मनोज्ञ वेध नीलकंठ कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो. कायमचं अगम्य असं स्त्री-पुरुष नातं ! प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा ! नियतीच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणारं आयुष्य आणि त्यात अडकलेलं अवघं मनुष्यजीवन ! अशी सगळी घट्ट वीण अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची देखणी धडपड चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर यांसारख्या कथांमधून जाणवत राहते. उत्कंठा जागवणाऱ्या, आतला तळ ढवळून टाकणाऱ्या, भ्रम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणाऱ्या या कथा म्हणजे एक तरल अनुभूती !

अभिप्राय स्त्री-पुरुष आणि नियती यांचे रंग दाखवणाऱ्या कथा

           लोकप्रभा २५-१-२०१९

या सर्वच कथा, आतापर्यंत न स्पर्श झालेल्या विषयांच्या आहेत. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच अशा कथा या अगोदर वाचनांत कधीही आलेल्या नाहीत. आपला वाचक मित्र भालचंद्र लेले

लेखक : स्नेहल जोशी 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details