Akshardhara Book Gallery
Nehru-Patel-Bose (नेहरू-पटेल-बोस)
Nehru-Patel-Bose (नेहरू-पटेल-बोस)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sunil Sangle
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 266
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ----
नेहरू-पटेल-बोस
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे महात्मा गांधी हे निर्विवाद जननायक होते.
या लढ्यात त्यांचे सर्वात लोकप्रिय साथीदार होते जवाहरलाल नेहरू,
वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस! हे तीन नेते भिन्न स्वभावाचे,
कमी-अधिक आक्रमक आणि अंतिम ध्येयासाठी कोणता मार्ग स्वीकारायचा
याबाबत भिन्न मते असलेले होते. या तिघा नेत्यांत तुलनेत नेहरू आणि
बोस वयाने लहान, जास्त आक्रमक आणि समाजवादी विचारसरणीवर
आग्रही होते. या तिन्ही नेत्यांचे परस्परांशी अनेक मूलभूत मतभेद होते
आणि तरीही केवळ स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय नसून भविष्यातील आधुनिक
व बलशाली भारत हे ते ध्येय आहे यावर त्यांचे एकमत होते. आपले
वैयक्तिक मतभेद या अंतिम ध्येयासाठी दूर सारून या नेत्यांनी परस्पर
संबंध कसे जोपासले हा त्या काळातील एक मनोज्ञ इतिहास आहे.
आज जेव्हा या तीन नेत्यांना परस्परांच्या विरोधात उभे करून त्यांची
बदनामी केली जाते तेव्हा या इतिहासाचा धांडोळा घेणे आवश्यक
ठरते. हे पुस्तक त्याचाच एक प्रयत्न आहे.
लेखक : सुनिल सांगळे
प्रकाशन : मनोविकास
