Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Neharunchya 115 Ghodchuka (नेहरूंच्या ११५ घोडचुका)

Neharunchya 115 Ghodchuka (नेहरूंच्या ११५ घोडचुका)

Regular price Rs.675.00
Regular price Rs.750.00 Sale price Rs.675.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

'घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या बऱ्याच योजना आणि बरेच विचार आजही जिवंत आहेत. ते ज्या मार्गावर चालले तो चुकीचा होता हे आपल्याला समजणे आवश्यक आहे. नेहरूंनी केलेल्या घोडचुकांच्या मालिकेचा वर्णपट उलगडायचा ठरवला तर त्याची व्याप्ती फारच मोठी आहे असे म्हणणे अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही. नेहरूंनी राजकारणात सत्तेसाठी घराणेशाहीचा आग्रह धरला नसता, तर त्यांच्या कालखंडाच्या उत्तरार्धात भारत झपाट्याने, सर्वार्थाने चमकदार, समृद्ध आणि पहिल्या जगातील देश बनण्याच्या मार्गावर चालू लागला असता.. आणि १९८०च्या पूर्वार्धापर्यंत तरी तसे चित्र नक्की दिसले असते.. पण दुर्दैवाने नेहरूंच्या कालखंडाने भारतात गरिबी, विपन्नावस्था आणि दुःखाचा पाया घातला आणि त्याला कायमचेच विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या, अगदी कनिष्ठ दर्जाच्या, तिसऱ्या जगातील यादीत नेऊन बसवले. या घोडचुकांची कालानुक्रमाने मांडणी केल्याने हे पुस्तक एकंदरीत वरकरणी वरवर दिसणाऱ्या देखाव्यामागे असणाऱ्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकते.

View full details