Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nek Namdaar Gokhale (नेक नामदार गोखले)

Nek Namdaar Gokhale (नेक नामदार गोखले)

Regular price Rs.1,080.00
Regular price Rs.1,200.00 Sale price Rs.1,080.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Govind Talvalkar

Publisher: Mouj Prakashan

Pages: 615

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

नेक नामदार गोखले

गोविंदराव तळवलकर हे द्रष्टा इतिहासकार, विचारवंत, समाजसुधारक व उदारमतवादी पत्रकारितेचा मानदंड म्हणून सुविख्यात आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील अग्रगण्य नेमस्त, उदारमतवादी नेते, व्यासंगी संसदपटू गोपाळ कृष्ण गोखले यांचे नेक नामदार गोखले हे केवळ चरित्र नाही. तत्कालीन व्यक्तींची मानसिक ठेवण, भूमिका, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती व प्रश्न अशी व्यापक पार्श्वभूमी आणि दृष्टिकोन विचारात घेऊन गोखले यांचे जीवन व कार्य यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषणही या ग्रंथात आहे. या विश्लेषणातून तळवलकर यांनी काही विशिष्ट नेते, काही महत्त्वाच्या घटना यांचा नवा अन्वयार्थ लावत त्यावर नव्याने प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्र, भारत, ब्रिटन, युरोपमधील त्या वेळचे आचारविचार, संस्कृती, धर्म, सामाजिक घडामोडी, प्रमुख व्यक्तींचे कार्य व बरोबरीने त्यांच्या काळाचा आढावा घेतल्यामुळे, आधुनिक भारताचा सर्वंकष इतिहास समजून घेण्यासाठी नेक नामदार गोखले या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे.

लेखक. गोविंद तळवलकर 
प्रकाशक. मौज प्रकाशन 

View full details