Nirala (निराळा)
Nirala (निराळा)
Share
Author: Jaywant Dalvi
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
चक्र.... स्व-गत... धर्मानंद ... यांसारख्या विविध प्रकृतींच्या आणि व्यक्तिचित्रांच्या कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकाचा हा नवा कथासंग्रह ! यातली एक एक कथा वाचता वाचता मन अक्षरशः चक्रावून जाते. वाटते, ही पात्रे या लेखकाला सुचली कशी ? भेटली कुठे ? जयवन्त दळवी यांचा आतापर्यंतचा लेखनप्रवास पाहिला, तर लक्षात येईल, की त्यांना भोवतालच्या सामान्य, अतिसामान्य लोकांबद्दल अधिक कुतूहल आहे. सामान्य जीवन जगणारी माणसे ज्यांच्या आयुष्यात अर्थ नाही, पराक्रम नाही, अशी माणसे, त्यांच्यांतील स्त्री-पुरुष संबंध, त्यांचे जगण्याचे संघर्ष, पोट भरण्याचे प्रश्न यांविषयी जयवन्त दळवी यांना विशेष रस आहे. त्याचाच परिपाक म्हणजे या चोवीस कथा ! मनुष्यस्वभावाचे कितीतरी नमुने ! मन गुंतवून टाकणारे. मन हेलावून सोडणारे. तसेच मन थक्क करणारे !