Pindari Glacier Treck ( पिंडारी ग्लेशियर ट्रेक )
Pindari Glacier Treck ( पिंडारी ग्लेशियर ट्रेक )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हे पुस्तक मी पुणे माऊंटेनियर्स या गिर्यारोहण संस्थेसोबत १४ ते २८ मे २०२२ दरम्यान केलेल्या पिंडारी ग्लेशियर ट्रेकबद्दल अनुदिनी (ब्लॉग) स्वरूपातील वर्णन आहे. पिंडारी ग्लेशियर हा पिंदर नदीचा स्त्रोत आहे. पिंदर नदीचा कर्णप्रयाग येथी अलकनंदा नदीबरोबर संगम होतो या ट्रेकची वाट नंदादेवी अभयारण्यातून जात असल्याने विविध प्रजातींच्या वनस्पती, फुल आणि हिमालयीन पक्ष्यांच दर्शन आपल्याला होत.
हे ग्लेशियर हिमालयीन ग्लेशियर्समधील सगळ्यात सुलभ असल्याने, तिथ पोचण्यासाठीचा ट्रेक त्यामानाने सोपा असल्याने नवीन ट्रेकर्ससाठी ही खूप चांगली पर्वणी आहे. पिंडारी ग्लेशियर हे भारतातील सर्वोच्च शिखर असलेल्या नंदादेवी शिखराच्या ( उंची ७८१६ मीटर्स ) अगदी टोकाशी आहे. पिंदारी ग्लेशियरचा झिरो पॉईंट हा फुरकिया पासून ५ किलोमीटर अंतरावर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची ३६६० मीटर्स ( १२००७ फूट ) इतकी आहे. उत्तराखंड प्रदेशातील बागेश्वर जिल्ह्यात हे ग्लेशियर असून ते नंदादेवी आणि नंदा कोट या बर्फाच्छादित शिखरांच्या मध्यभागी बसलेले आहे. नंदादेवी आणि आजूबाजूच्या हिमालयीन शिखरावरून प्रचंड प्रमाणात स्खलन होणार्या बर्फामुळे या ग्लेशियरची निर्मिती झाली असून गेल्या शतकापासून गिर्यारोहकांना ते भुरळ घालत आल आहे. स्थानिक लोक या ग्लेशियरला कुमाऊचा आत्मा म्हणून संबोधतात, यावरून याच महत्त्व लक्षात येत.
Author | :Nitin Shrotri |
Publisher | :Nitin Shrotri |
Binding | :paperbag |
Pages | :83 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |