Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nivadak Kathasangrah (निवडक कथासंग्रह)

Nivadak Kathasangrah (निवडक कथासंग्रह)

Regular price Rs.130.50
Regular price Rs.145.00 Sale price Rs.130.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Himanshu Joshi

Publisher: National Book Trust

Pages: 174

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Nivadak Kathasangrah (निवडक कथासंग्रह)

हिमांशु जोशी : निवडक कथा, यामध्ये लेखकानं निवडलेल्या तेवीस कथा आहेत, एका मोठ्या लेखकाच्या पाच दशकांच्या कामाचं मूल्यमापन या अशा निवडक कथांमधून करणं अशक्य आहे; पण प्रतिनिधीरूपानं हिमांशु जोशींना (१९३५) आपण इथं पाहू शकतो. प्रत्येक चळवळीच्या मागे वैचारिक बैठक अनिवार्य असल्याचं मानणारा हा लेखक 'समांतर कहानी आंदोलनाशी याच संकल्पनेने जोडला गेला की, समाजाच्या जे मागे राहिले, त्यांच्याशी जोडलेले असावे. पुढे समांतर आंदोलन गुंडाळलं गेलं; पण हिमांशु जोशी त्यांच्याशी जोडलेलेच राहिले आणि आपल्या संवेदना आणि रचनेच्या प्रवासाचा विस्तार करत राहिले. कल्पना आणि वास्तव, फँटसी आणि वास्तविकता यांमध्ये गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये स्वातंत्र्योत्तरकालीन भारतीय नागरिकाचं जीवन प्रपंच, संशय आणि दहशत यांमध्ये व्यतीत होत राहिलं. त्याचं विस्मयकारी रहस्य या कथांमध्ये पूर्णपणे विश्लेषित झाले आहे. लहान मुलासारखी जिज्ञासा, कुठले तरी आठवणींचे धागे, कुठं पारिवारिक जीवनतले चढउतार, तर कुठं उपेक्षितांचं दुःख-कधी या कथा म्हणजे आयुष्य आहे, तर कधी आयुष्य म्हणजे कथा आहे असं वाटायला लागतं. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या हिमांशु जोशींचं इतर महत्त्वाचं साहित्य आहे - अंततः, मनुष्यचिन्ह, गंधर्वचिन्ह-कथा संग्रह, सुराज, समयसाक्षी - कादंबरी. त्यांच्या अनेक कलाकृती देशी आणि परदेशी भाषांमधून अनुवादित झालेल्या आहेत आणि प्रशंसाप्राप्त झालेल्या आहेत.

लेखक: हिमांशु जोशी
अनुवाद: डॉ. अरुण मांडे
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया 

View full details