Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Nivdak Kavita (निवडक कविता)

Nivdak Kavita (निवडक कविता)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Salil Wagh

Publisher: Varnamudra Publishers

Pages: 118

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

निवडक कविता

कवितेला काहीतरी शोधून काढायचं असतं. कविता हा शोध घेणारा जीव आहे. जगातल्या, जीवसृष्टीतल्या माणसामाणसांच्या समूहासमूहाच्या आयुष्यकाळात अनेक गोष्टी घडतात. त्या घटनांची व्यावहारिक संगती कोणतीही मानवजात लावतच असते पण तिची पराव्यावहारिक संगतीही लागावी लागते. ते काम कविता करते. कविता ही क्रिप्टॉलॉजी असते. कवी हा क्रिप्टॉलॉजिस्ट असतो. कवितचे कवितापण तिच्या क्रिप्टॉलॉजित आहे. जगण्यात आणि जगात, जळींस्थळीं, काष्ठींपाषाणीं विस्मय भरलेला असतो. जग आणि जीवन हे विस्मयरूप आहे. त्या विस्मयाची अनेक रूपे माणसाला रोज भेटतात. त्यांना तो लक्षित किंवा दुर्लक्षित करत असतो. या सनातन विस्मयाचा उलगडा करणे कवितेचे काम असते. ही विस्मयाचा उलगडा करण्याची प्रेरणा म्हणजेच काव्याची प्रेरणा. ही प्रत्येक माणसात निसर्गतःच असते. हे विस्मय भाषादत्त असतात किंवा भाषातीतही असतात. सैन्यात शत्रूपक्षाचे बिनतारी संदेश पकडून ते उकलणारे किंवा सॉफ्टवेअरचे पासवर्ड मिळवणारे, सोर्सकोड हुडकून काढणारे किंवा ध्वनिशास्त्रात साउंडमधून 'नॉइज टू सिग्नल' असा एक रेश्यो असतो तो रेश्यो ओळखून 'सँपल साउंड'मधून त्यातला सिग्नल वाचणारे अन् विश्लेषित करून त्याचा अन्वयार्थ मांडणारे असे क्रिप्टॉलॉजिस्ट असतात. कवी हा असाच संस्कृतीचा क्रिप्टॉलॉजिस्ट असतो. कविता ही क्रिप्टॉलॉजी असते. संकेतभेद करणे हे कवीचे काम. आणि तो संकेतभेद केल्यावर पुन्हा त्याचा आशय किंवा अन्वयार्थ जवळपास स्वयंनिरपेक्ष (डिव्हाईस इंडिपेंडन्ट) स्वरूपात बांधणे, ते करताना भाषेच्या नियमांची, दंडुकेशाहीची फिकीर न करता, प्रसंगी अभिरुचीला छेद देत, वाचकाला अंतर्मुख करून त्याच्या जिज्ञासेचा प्रक्षोभघडवून आणणे हे काम कविता करते. कविता ही संकेतभेदाची विद्या आहे. ती नुसते शास्त्र नाही. ती नुसती कला नाही. ती विद्या आहे, जिच्यात शास्त्र आणि कला दोन्ही येतात.

लेखक. सलील वाघ 
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स 

View full details