Akshardhara Book Gallery
Olakha Chichundarichi (ओळख चिचुंदरीची)
Olakha Chichundarichi (ओळख चिचुंदरीची)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Ra. V. Ranade
Publisher: Continental Prakashan
Pages: 98
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Olakha Chichundarichi (ओळख चिचुंदरीची)
लेखकाच्या पीएच.डी.च्या प्रबंधावर आधारलेल्या या पुस्तकात 'चिचुंदरी' या सर्वत्र आढळणाऱ्या व उंदराचाच एक प्रकार, असा गैरसमज असणाऱ्या सस्तन प्राण्याचा परिचय करून दिला आहे.
घराचा परिसर तसेच शेतातली उपद्रवी ठरणारी झुरळे व इतर कीटक यांवर तिचे पोट भरते. उंदरांशी तर चिचुंदरीचा उभादावा. त्यांचे नुसते असणेही तिला सहन होत नाही. परिणामी उंदीर तिच्या हल्ल्याला बळी पडतात किंवा घाबरून दूर राहतात. या सगळ्यांतून अन्नधान्याची नासाडी व इतर नुकसान टळते. म्हणून चिचुंदरी म्हणजे 'समृद्धीचे प्रतीक' तर तिचा वावर म्हणजे 'लक्ष्मीचा निवास' असे मानले जाते.
अभ्यासकांच्या मताने चिचुंदरी सर्व वरिष्ठ सस्तन प्राण्यांचे मूळ घराणे असून उंदरांपासून माणसापर्यंत सर्व तिच्यापासून अस्तित्वात आले आहेत, तिचे वंशज आहेत. चिचुंदरीच्या शरीर रचनेचा व क्रियांचा अभ्यास करून वरील मतात किती तथ्य आहे, याचा मागोवा घेतला आहे.
घरचिचुंदरीचा उगम व प्रसार, भारतातील इतर चिचुंदऱ्या, माणूस व चिचुंदरी संबंधांतील अधिक-उणेपण, संशोधन क्षेत्रातील चिचुंदऱ्यांचा वाढता वापर इत्यादी बद्दलही दिले आहे.
थोडक्यात, चिचुंदरीबद्दल असे काय लिहिण्यासारखे असणार? असा क्वचित् उपेक्षेचा, आश्चर्याचा व चेष्टेचा स्वर-समज या पुस्तकाने दूर होईल असा विश्वास वाटतो.
लेखक: डॉ.रा.वि.रानडे
