Akshardhara Book Gallery
Origin Of Species : Nisargatil Jaatincha Ugam (ओरिजिन ऑफ स्पेसीज : निसर्गातील जातींचा उगम)
Origin Of Species : Nisargatil Jaatincha Ugam (ओरिजिन ऑफ स्पेसीज : निसर्गातील जातींचा उगम)
Share
Couldn't load pickup availability
Author: Charls Darvin
Publisher: Goyal Prakashan
Pages: 376
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dhananjay Keskar
ओरिजिन ऑफ स्पेसीज : निसर्गातील जातींचा उगम
माणसांचा उगम व त्यांचा इतिहास यावर प्रकाश टाकला जाईल
चार्ल्स डार्विन हे निसर्गाचे अभ्यासक, भू-विज्ञानशास्त्रज्ञ व जीवशाखज्ञ होते. त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जीवांच्या सर्व जाती या एकाच पूर्वजाच्या वंशज आहेत, हा त्यांचा सुप्रसिद्ध सिद्धांत विज्ञानाची पायाभूत संकल्पना आहे.
जीवसृष्टीच्या भौतिक परिस्थितीचा परस्पर संबंध याविषयीचे रूढिप्रिय विचार आणि कल्पना किंवा विशास यांना आव्हान देणारा सिद्धांत या पुस्तकातून ते मांडतात. गुंतागुंतीचे व क्लिष्ट असे जातींचे एकमेकांवरील, तसेच सभोवतालच्या परिस्थितीवरील किंवा वातावरणावरील परस्परावलंबन या पुस्तकातून उघड होते.
ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यासंबंधी खूपच विवाद होते व आजही ते तसेच आहेत. परंतु हे पुस्तक काळाच्या ओघात सर्व कसोट्यांना उतरले आहे व मनुष्याच्या उत्क्रांतीसंबंधी शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यात अग्रगण्य ठरले आहे.
निसर्गप्रेमींसाठी या पुस्तकात डार्विनच्या इंग्रजी पुस्तकातील शास्त्रीय माहिती, निरीक्षणे आणि चर्चा शास्त्रीय परिभाषेत पण सोप्या व आकर्षक शैलीत मांडली आहेत. मराठी वाचकांच्या दृष्टीने डॉ. धनंजय केसकर यांचे निसर्गातील जातींचा उगम हे पुस्तक 'वैचारिक खजिना' आहे.
मूळ लेखक. चार्ल्स डार्विन
अनुवादित लेखक. धनंजय केसकर
प्रकाशक. गोयल प्रकाशन
