Akshardhara Book Gallery
Orwelliya (ऑर्वेलिया)
Orwelliya (ऑर्वेलिया)
Couldn't load pickup availability
Author: Manoj Surendra Pathak
Share
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 136
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
ऑर्वेलिया
जॉर्ज ऑर्वेल यांनी नाइन्टीन एटीफोर ही कादंबरी १९४८ साली लिहिली. ती १९४९ साली पुस्तकरूपात प्रकाशित झाली. तेव्हा ती समकालीन होती, आणि आज २०२० सालीही ती समकालीनच आहे. १९४९ मध्ये या कादंबरीत भविष्यकालीन स्थिती वर्णिली आहे, ३६ वर्षांनंतर जग कोणत्या स्थितीत असेल याची कल्पना केली आहे असे काही तत्कालीन वाचकांना वाटले असेल, काहींना ३६ वर्षांनंतरच्या जगाची नव्हे तर आजच्याच जगाची स्थिती या कादंबरीत दाखवली आहे असेही वाटले असेल. १९८४ नंतरच्या ३६ वर्षांमध्ये ही कादंबरी १९८४ च्या आसपासची केवळ नव्हे तर कालच्या आजच्या १९८५ पासून २०२० पर्यंतची आहे असे पुष्कळ वाचकांना वाटल्याचे दिसलेले आहे. गेली सत्तर वर्षे ही कादंबरी लोकांच्या नुस्त्या स्मरणात नव्हे तर वाचनात आहे. कारण कोणत्याही काळातल्या वाचकाला ती आपल्याच आजच्या काळाचा आलेख दाखवणारी आहे असे वाटलेले आहे. हिटलरशाही, स्टॅलिनशाही, धार्मिक हुकूमशाही या वस्तुस्थिती आहेत आणि त्यांचीच रूपान्तरे जगात अनेक ठिकाणी अनुभवास येत गेलेली आहेत. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांतही कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे याची जाणीव दिवसेंदिवस तीव्रतेने होऊ लागलेली आहे. नाइन्टीन एटीफोरमधले बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे वाक्य आज कोणत्या ना कोणत्या रूपात आणि सर्वत्रच प्रत्ययास येत राहते. इतरही काही गोष्टी आज आपल्या वास्तवाच्या भाग झालेल्या आहेत, त्यांचा उच्चार या कादंबरीत झालेला आहे. दमनकारी सत्ता दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणायला लावत असते. बहुसंख्य जनता, त्यात बुद्धिजीवी, विचारवंत, मध्यमवर्गीयही आले, ते मान्य करते. परंतु अशाही काही व्यक्ती असतात, ज्यांना दोन अधिक दोन बरोबर चार हेच म्हणायचे असते, नाइन्टीन एटीफोरमध्ये दोन अधिक दोन बरोबर पाच म्हणणारी सर्वकष सत्ता आणि दोन अधिक दोन बरोबर चार म्हणू पाहणारी सामान्य व्यक्ती यांच्यातला विकराळ संघर्ष आहे. या संघर्षात ही व्यक्ती पराभूत होणार हे वाचकाला आधीपासूनच माहीत असते, तसे त्याने गृहीत धरलेले असते. अर्थातच त्या व्यक्तीचा पराभव म्हणजे डोके ताळ्यावर ठेवू पाहणाऱ्या सर्वच व्यक्तींचा पराभव हेही माहीत असते. एका अर्थाने वाचक स्वतःच्याच शोकात्म पर्यवसानाची कहाणी वाचत असतो.
संपादक. मनोज सुरेंद्र पाठक
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
