Shri Tulajabhavani (श्री तुळजाभवानी)
Shri Tulajabhavani (श्री तुळजाभवानी)
Share
Author:
Publisher:
Pages: 654
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. भाग्यविधाती आहे. ती सर्जक आहे. संगोपक आहे आणि संहारकही आहे. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली अशी ती त्रिरूपा आदिशक्ती आहे. तिचे रूप हे महिषमर्दिनीचे रूप आहे. आपल्या अष्टभुजांत विविध आयुधे धारण करून ती महिषादि असुरांचा संहार करते आणि अथांग वत्सलतेने आपल्या भक्तांचा प्रतिपाळ करते. सप्तशतीत साकारलेले श्रीतुळजाभवानीचे महिषमर्दिनीरूप जसे ज्ञानदेवांच्या नितांत श्रद्धेच्या विषय बनून राहिले, तसेच ते शिवछत्रपतींच्याही श्रद्धेचा ठाव बनले. स्वातंत्र्यसमरात परकीय सत्तेशी झुंज घेताना वीरांना आणि वाडमयकरांना प्रेरणा देणारी ही दिव्य आदिशक्ती त्या काळी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताचीही स्वातंत्र्यसंजीवनी ठरली. या शोधग्रंथात श्रीतुळजाभवानी या देवतेचा पौराणिक आणि ऎतिहासिक शोध घेत असतानाच देवीतत्त्वाने भारलेल्या एका प्राचीन मिथकाची प्रेरकता डॉ. रा. चिं. ढेरे यांनी अनेक अंगांनी उलगडली आहे.
ISBN No. | :PAD0090 |
Author | :R C Dhere |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :654 |
Language | :Marathi |
Edition | :2012/01 - 1st/2007 |