Skip to product information
1 of 1

akshardhara

Padmagandha Diwali Ank 2026 (पद्मगंधा दिवाळी अंक 2026) Booking Start

Padmagandha Diwali Ank 2026 (पद्मगंधा दिवाळी अंक 2026) Booking Start

Regular price Rs.350.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.350.00
12% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अरुण जाखडे यांनी नावारूपाला आणलेल्या 'पद्मगंधा'ने त्यांच्यानंतरही गेल्या पाच वर्षात तोच दर्जा राखलेला आहे. गतवर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद व पुण्यभूषण प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दिवाळी अंक पुरस्काराचा मानकरी ठरला होता. कथा, लेख, एका लेखकाची दीर्घ मुलाखत, एखाद्या वेगळ्याच विषयावरचे अनुभव, परिसंवाद ही पद्मगंधाची खासीयत असते. यंदा माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची कथा आणि भारत सासणे यांची अनुवादित कथा आहे. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी कविश्रेष्ठ ना. घ. देशपांडे यांचे रेखाटलेले शब्दचित्रही भावेल. ज्येष्ठ लेखिका सानिया यांची कथानिर्मिती, पात्रांचा अवकाश, लेखकाचे स्वातंत्र्य, समकालीन आव्हाने यावर वृषाली देशपांडे यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत आहे. संजय आर्वीकर यांनी 'एका नटाचा मृत्यू' या नाटकाच्या संहितेचा केलेला विचार महेश एलकुंचवार यांच्या नाट्यसंहितांकडे वेगळेपणाने पुन्हा पाहायला लावणारा आहे. एखाद्या वेगळ्या अनुभवावर दोन व्यक्तींना लिहिते करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात पद्मगंधाने आवर्जून केला आहे. यंदाही असाच प्रयोग केला आहे.  ऐन तारूण्यात व्यावहारिक पातळीवर यशस्वी असतानाच फकिरी वृत्तीने जगणाऱ्या फकीर व सुजाता व्योमा यां दोघांचे अनुभव आध्यात्मिक आवड असणाऱ्यांना आवडतीलच, पण त्यापासून दूर असणाऱ्यांनाही उत्सुकता वाटेल असे आहेत. मानसी होळेहोन्नूर, प्रियांका पाटील, रवींद्र तांबोळी यांच्या कथा, डॉ. उज्ज्वला बर्वे, अभिषेक जाखडे, आश्लेषा महाजन यांचे लेख उत्कंठा वाढवणारे आहेत.
एखाद्या विषयाची चर्चा हे पद्मगंधाचे वैशिष्ट्य आहे. लैंगिकतेसंबंधी बोलण्याबाबत अजूनही पुरती मोकळीक नाही. लैंगिक शिक्षणाचा आग्रह धरणाऱे व त्यासाठी समाजाकडून त्रासही सहन करावा लागलेले र. धों. कर्वे यांचे लेखन पद्मगंधाने प्रकाशित केले आहे. त्याच धारेने पुढे जात यंदा काम, संस्कृती आणि समाज या विषयावर या अंकात वीस लेखकांनी केलेली चर्चा अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. लैंगिकतेबाबतचे संशोधन, गैरसमज, धर्मात असलेले स्थान, वात्सायनाने नेमके काय सांगितले, शिखंडीला सन्मान का मिळाला नाही, युद्धात व हेरगिरीसाठी लैंगिकतेचा वापर कसा केला गेला, लोकभाषेत व आता सोशल मिडियावरची लैंगिक भाषा कशी आहे, याबरोबरच कला, साहित्य, चित्रपट यात लैंगिकतेचा विचार कसा करण्यात आला आहे. एका महत्त्वाच्या विषयावरची चर्चा खुली करण्यात आली आहे, असे म्हणता येईल.

View full details