Akshardhara Book Gallery
Panchgangechya Teeravarun (पंचगंगेच्या तीरावरून)
Panchgangechya Teeravarun (पंचगंगेच्या तीरावरून)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Jaysingrao Pawar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 636
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
पंचगंगेच्या तीरावरून
सांगली जिल्ह्यातील तडसर गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा कोल्हापुरात शिकायला येतो आणि शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून प्राध्यापक, इतिहास संशोधक व इतिहासकार होतो. इतिहास क्षेत्राबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी त्याचा परिचय होतो आणि यशस्वीपणे त्याचं जीवन घडत जातं. हा जीवनप्रवास आहे नामवंत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा. या आत्मचरित्रातून त्यांचं शालेय, महाविद्यालयीन, कौटुंबिक जीवन उलगडतं. त्यांचा प्राध्यापकीचा, संशोधनाचा, लेखनाचा प्रवास तपशीलाने उद्धृत केलेला दिसतो. त्या त्या वेळच्या महत्त्वाच्या घटना (उदा. जेम्स लेन प्रकरण, दादाजी कोंडदेव प्रकरण) कधी तपशिलाने तर कधी संक्षिप्तपणे नोंदवल्या आहेत. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीने प्रेरित या व्यक्तिमत्त्वाच्या या आत्मचरित्रातून त्या-त्या वेळची सामाजिक, राजकीय परिस्थतीही उलगडते. त्यामुळे हे आत्मचरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.
लेखक. डॉ. जयसिंगराव पवार
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
