Akshardhara Book Gallery
Pangara (पांगारा)
Pangara (पांगारा)
Couldn't load pickup availability
Author: Dr Vasudha Vaidya
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 102
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पांगारा
स्त्री जेवढी मनात बोलते, तेवढी जनात बोलत नाही. तिच्या मनात वेदनेचे विवर असते. पण वेदनेचा सल हा निःश्चल असतो. वेदनेतून संवेदना जागृत होते.. याचे हुबेहूब प्रत्यंतर वसुधा वैद्य यांच्या 'पांगारा' या कवितासंग्रहात आपणास येते..!
अंतस्थ अस्फुट भावनांना जेव्हा सुजाण अभिव्यक्तीची सौंदर्यपूर्ण जोड लाभते, तेव्हा साऱ्या अव्यक्ताचे रंग तुषार बनून बरसू लागतात.
सुखाच्या सरींनी आयुष्य भिजले, जरीही रूजले, दुःख थोडे.
अशी ही अमृताची पालवी मनाच्या फांदीवर झळाळू लागते आणि शब्दांचे रसपूर्ण आभाळ मोकळे होते. कोलाहल चांदण्यात विरघळतो नि मनाच्या कोऱ्या कागदावर कविता अवतरते..! वसुधा वैद्य यांच्या कविता अशा सहजगत्या अवकाशातून शब्दकळेत अवतरतात..!
सुखासंगे दुःख, सोसून जगावे, विष जरी ठावे, प्राशूनिया
हृदयात सल असेल तर अस्सल निर्माण होते. अंतस्थ विषयांवर मार्मिक आणि सहज शब्दांतून वसुधा वैद्य यांनी आपल्या कवित अभिव्यक्त केल्या आहेत. त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी सर्व कवी-कुलातर्फे हार्दिक शुभेच्छा..!!
लेखक. डॉ. वसुधा वैद्य
प्रकाशक. मिहाना प्रकाशन
