Akshardhara Book Gallery
Parees (परीस)
Parees (परीस)
Share
Couldn't load pickup availability
Author: Achala Joshi
Publisher: Popular Prakashan
Pages: 151
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
परीस
स्वतंत्र, मोकळी आणि निर्भय… अचला जोशी यांनी वयाच्या परिपक्व अवस्थेतील स्वतःचं वर्णन असं केलं आहे. ती त्यांची मनोवस्था झाली. परंतु त्यामागे उभं आहे ते एक भलंमोठं, स्वत्व असलेलं कणखर व्यक्तिमत्त्व. तितकंच सहृदय, संवेदनशील. अचला जोशी यांची कर्तबगारी मोठी आहे. त्यांना भारताची पहिली ‘वाईन लेडी’ असंच म्हणतात. त्यांनी ‘क्विल्ट’, ‘च्यवनप्राश’ असे अनुषंगिक उद्योगही उभे केले.
त्यांची समाजधारणा पक्की आहे. आईवडिलांचे संस्कारही सार्वजनिक हिताचे होते. त्यामुळे अचला जोशी यांनी समाजोपयोगी अनेक कामे केली – निराधार मुलींचा आश्रम सांभाळला, महिलांना सक्षम बनवण्यासाठी कौशल्य-शिक्षणासारखे उपक्रम केले. तशा उपक्रमांमागे आहे तो त्यांच्या मनीचा कृतज्ञता भाव ! अचला जोशी यांनी ‘आश्रम नावाचे घर’, ‘ज्ञानतपस्वी रुद्र’, ‘चंद्रमे जे अलांछन’ आणि अन्य अनेक व्यक्तिचित्रं असं लेखन केलं आहे.
कर्तबगारी आणि लेखनकौशल्य असा अनोखा संगम अचला जोशी यांच्या ठायी आहे. त्यांना घरातलं मनमोकळं वातावरण आणि न. र. फाटक, श्री. पु. भागवत यांच्यासारखे गुरू लाभले. त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत गेलं. ही सारी कहाणी अचला जोशी यांनी इथं सांगितली आहे. म्हणून पुस्तकाचं शीर्षक आहे – ‘परीस’. – दिनकर गांगल
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
