Akshardhara Book Gallery
Parnsrishti (पर्णसृष्टी)
Parnsrishti (पर्णसृष्टी)
Couldn't load pickup availability
Author: Asha Ugavkar
Share
Publisher: Continental Prakashan
Pages: 68
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पर्णसृष्टी
पाने या वनस्पतींच्या महत्वाच्या पण दुर्लक्षित अंगाविषयी या पुस्तकात संकलित केलेली विस्तृत माहिती विस्मयकारक आहे. इंधन जाळून आपण निर्माण करत असलेला कार्बन डायॉक्साईड पानांमधून शोषला जातो हा फुले-फळांखेरीज वनस्पतींचा माणसाला होणारा खरा जीवनदायी उपयोग आहे, कारण पानासारखे यंत्र माणूस अजूनही निर्माण करू शकलेला नाही. दुर्दैवाने आपण अमर्यादित इंधन जाळून झाडांकडून अवास्तव अपेक्षा करतो.
पानांतील रंग, आकार, रचना यातील विविधता झाडांचे सौंदर्य खुलवतात. पानांतली हीच वैशिष्ट्ये वनस्पतींची खरी ओळख पटवतात. ही वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण विस्ताराने दिली आहे. त्यामुळे वनस्पतींची आणि बागकामाची आवड असणा-यांचे शंका निरसन तर होईलच शिवाय त्यांना पानांची संपूर्ण माहिती या पुस्तकातून मिळणार आहे. घरात आपल्या आवडीची झाडे निवडण्यासाठी या पुस्तकाची मदत होईल.
रंगीत फुले आणि रसभरीत फळे नसतानाही झाडांकडे निसर्गप्रेमींचे लक्ष वेधण्याचे काम पर्णसृष्टी हे पुस्तक करेल हे नक्की!_श्रीकांत इंगळहळीकर
लेखक : सौ. आशा उंगावकर
