Akshardhara Book Gallery
Paryavaranvadacha Jagatik Itihas ( पर्यावरणवादाचा जागतिक इतिहास )
Paryavaranvadacha Jagatik Itihas ( पर्यावरणवादाचा जागतिक इतिहास )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 191
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pranav Sakhdev
पर्यावरणवादाचा जागतिक इतिहास
प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा या पुस्तकात तीन खंडांमधल्या पर्यावरणाबाबतच्या चळवळी, घडामोडी आणि या क्षेत्रातले विचारवंत यांची तपशीलात माहिती देतात. सखोल संशोधनातून त्यांनी पर्यावरणाबाबतच्या चळवळींमधल्या संकल्पना, विचार आणि मोहिमा यांचा ऊहापोह केला आहे. जॉन म्युईर, महात्मा गांधी, राचेल कार्सन आणि ऑक्टाविया हिल या जागतिक पातळीवरच्या पर्यावरण विचारवंतांच्या कामांचाही आढावा घेतात. तसंच चिपको आंदोलन किंवा जर्मन ग्रीन्स यांसारख्या चळवळींबाबतही खोलात जाऊन विवेचन करतात. जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती आणि सभ्यतांमध्ये पर्यावरण चळवळ कशी आकाराला आली आणि एका चळवळीच्या प्रभावाने इतर बाह्य संस्कृतींमधल्या चळवळी कशाप्रकारे रूपांतरित झाल्या याबद्दलची मौलिक अंतर्दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. जागतिक अर्थकारणावर बदलत्या पर्यावरणाचा होणारा परिणाम या सध्या जगभरात चर्चिला जाणाऱ्या विषयाचाही गुहा यांनी या पुस्तकात आढावा घेतला आहे.
या पुस्तकाचे लेखक : रामचंद्र गुहा, अनुवाद : प्रणव सखदेव, प्रकाशक : रोहन प्रकाशन