Skip to product information
NaN of -Infinity

Akshardhara Book Gallery

Paryavarniya Samiksha Aani Marathi Kadambari (पर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी)

Paryavarniya Samiksha Aani Marathi Kadambari (पर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Sandip Bhuyekar

Publisher:

Pages: 288

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

पर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी

साहित्यातील पर्यावरणीय संदर्भांचे पृथ्वीकेद्री दृष्टीकोनातून पुनर्वाचन करून, पर्यावरणीय नैतिकतेच्या अनुषंगाने केलेले विश्लेषण किंवा चिकित्सा म्हणजे पर्यावरणीय समीक्षा होय. पर्यावरणीय समीक्षेचा विचारव्युह हा व्यापक नीतीविचार आहे. विश्वबंधुता, मानवता ही रूढ नीतीतत्त्वे तर यामध्ये संमिलित आहेतच पण त्याही पुढे जाऊन प्रत्येक सजीवाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार पर्यावरणीय समीक्षा करते. मुंगी, हत्ती किंवा सूक्ष्मजीव या सर्वांना पर्यावरणीय समीक्षक सजीवता या एकाच निकषावर समान पातळीवर आणतात. याच बरोबरीने हवा, पाणी, जमीन इ. निर्जीव घटकांविषयीदेखील आदराची भावना ठेवतात. निसर्गासोबत एकसुरता किंवा सौहार्द राखून जगणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे, असे पर्यावरणीय समीक्षक मानतात. शाश्वत विकास आणि पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे साहित्यातील प्रतिबिंब शोधून त्याची परिपृष्टी पर्यावरणीय समीक्षेद्वारे केली जाते. प्रस्तुत पुस्तकात पर्यावरणीय समीक्षेचे सैद्धांतिक सूचन केले आहे आणि तिच्या उपयोजनाचाही प्रयत्न केला आहे. मराठीतील तेरा महत्त्वाच्या कादंबर्‍यांची पर्यावरणीय समीक्षा केली आहे. मराठी कादंबरीत उमटलेली ही पर्यावरणीय शहाणीव इतरत्र संक्रमित व्हावी व ‘वसुधैव कल्याणम्’चा सदभाव जागृत व्हावा हा नितळ हेतू या लिखाणामागे आहे. मराठी समीक्षा क्षेत्राला या पुस्तकाच्या रूपाने एक नवी समीक्षादृष्टी गवसेल असा विश्वास वाटतो.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन 

View full details