Paus Pani Hiravi Gani (पाऊस पाणी हिरवी गाणी) By Eknath Avhad
Paus Pani Hiravi Gani (पाऊस पाणी हिरवी गाणी) By Eknath Avhad
Share
Author:
Publisher: Dilipraj Prakashan
Pages: 64
Edition: 1st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Paus Pani Hiravi Gani (पाऊस पाणी हिरवी गाणी)
Auhtor :Eknath Avhad
लहानाहून लहान होता येणं, आपल्याच स्वतःच्या बालवयात जाता येणं, त्या बालवयातल्या आवडीनिवडी, आठवणी जोपासणं आणि पुन्हा जशाच्या तशा स्मरणं ही एक किमयाच असते. एकनाथ आव्हाड त्याचे किमयागार आहेत; असंही म्हणता येईल की तो त्यांचा स्वभाव आहे. त्याची सगळी प्रतिबिंबं त्यांच्या या लेखनात दिसतात. मुलांना ते मनापासून आवडतं. आवडीचं ते आनंदाचं असतंच असतं! डोंगराच्या शिखरापासून ते त्याच्या पायथ्याशी असलेल्या जगापर्यंत कवीचं निरीक्षण निरंतर चाललेलं असतं. तो जे बघतो तेच मुलांनाही दाखवतो आणि गंमत म्हणजे मुलांनाही ते आपलंच वाटतं. हेच कवीचं यश आणि तीच कवीची खरी कमाई. एकनाथ त्या कमाईचे धनी आहेत. वास्तवातून कल्पनेत घेऊन गेलं की नवे दरवाजे उघडतात. त्या दरवाजातून मुलं हसत-नाचत, खेळत- बागडत मोठ्या आनंदानं येतात जातात. मुलांसाठी हे दरवाजे उघडून दिल्याबद्दल एकनाथ यांचं मनापासून कौतुक! आणि त्यांच्या 'पाऊस पाणी हिरवी गाणी' या नवीन, टवटवीत, हिरव्यागार बालकवितासंग्रहास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- फ. मुं. शिंदे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष