Akshardhara Book Gallery
PEEK SANJEEVAKANCHEE KIMAYA (पीक संजीवकांची किमया)
PEEK SANJEEVAKANCHEE KIMAYA (पीक संजीवकांची किमया)
Couldn't load pickup availability
Author: B G BHUJABAL
Share
Publisher: Continental Prakashan
Pages: 145
Edition: 2014
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
PEEK SANJEEVAKANCHEE KIMAYA (पीक संजीवकांची किमया)
शेतीमध्ये पीक उत्पादन कसे काढावे याबद्दल भरपूर माहिती अनेक माध्यमांतून उपलब्ध आहे. तथापि, किफायतशीर शेती ही एक अवघड बाब बनत चालली आहे. किफायतशीर शेतीचा पाया हा चार खांबी तंबूवर आधारित आहे. अधिक उत्पादन, उच्च गुणवत्ता, माफक खर्च आणि उत्तम विक्री व्यवस्थापन हेच ते खांब आहेत. या चार खांबांचा समन्वय साधण्यासाठी पीक संजीवकांची माहिती, त्यांचा वापर, परिणाम इ. माहिती अगदी सामान्य शेतकऱ्यास आणि विद्यार्थ्यांस या पुस्तकातून मिळेल. सन १९७२ ते २०१२ या ४० वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी सर्व प्रकारच्या शेतीत पीक संजीवकांचा वापर केला आहे. संजीवके आपल्या दुबळ्या शेतीला संजीवनी देऊन किफायतशीर करण्यास निश्चितपणे हातभार लावतील, अशी माहिती या पुस्तकात आहे.
लेखक: डॉ. भी. गो.भुजबळ
