Akshardhara Book Gallery

Petersburgcha Ustaad (पीटर्सबर्गचा उस्ताद)

Petersburgcha Ustaad (पीटर्सबर्गचा उस्ताद)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: J.M. Kutsi

Publisher: Walden publication

Pages: 249

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:Avdhut Dongare

पीटर्सबर्गचा उस्ताद 

'पीटर्सबर्गचा उस्ताद' या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील रशियन लेखक पयोदोर दस्तयेवस्की मध्यवर्ती पात्र म्हणून आलेला आहे. कादंबरीतल्या  दस्तयेवस्कीचा पावेल हा सावत्र मुलगा १८६९ साली पीटर्सबर्गमध्ये भाड्याने राहत असतो. तिथे तो एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मरण पावल्याची तार त्या वेळी जर्मनीत ड्रेस्डनमध्ये असलेल्या दस्तयेवस्कीला मिळते. मग तो तडक पीटर्सबर्गला येतो. 
आपल्या मुलाचा मृत्यू नक्की कसा झाला, तो राजसत्तेविरोधात कट करणाऱ्या संघटनेशी संबंधित होता का, या संघटनेच्या नेत्याला एकंदर समाजविषयी काय वाटतं, तसेच का वाटतं, ते वाटणं फक्त विचारसरणीमधून आली की हा त्याहून अधिक खोलातला काही संघर्ष आहे, अश्या प्रश्नांचा शोध कूटसींच्या कादंबरीतला 
दस्तयेवस्की घेत जातो. एकीकडे मुलाच्या मृत्यूने दस्तयेवस्की शोकाकुल झालाय, तर दुसरीकडे तो या शोकाचं रूपांतर लेखनात करू पाहतोय. हे करत असताना त्याला व्यक्तिगत नात्यासोबतच परिसरातल्या घडामोडींविषयीचे प्रश्न सतावतायंत सतावतायंत. यातून त्याच्या लेखनाचा आशय गोळा होत जातो. दस्तयेवस्कीसारखा उत्कट लेखक या आशयाला कसा भिडत असेल, त्यातल्या सुष्ट, दुष्ट, याचा शोध घेण्याचा प्रयत्न  कूटसींनी 'पीटर्सबर्गचा उस्ताद' मध्ये केला आहे. 

प्रकाशक. वॉल्डन पब्लिकेशन 
लेखक. जे. एम. कूटसी

View full details