Akshardhara Book Gallery
Phuljhade (फुलझाडे)
Phuljhade (फुलझाडे)
Share
Couldn't load pickup availability
Author: M.S. Randhava
Publisher: National Book Trust
Pages: 201
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vyankatesh Vakil
Phuljhade (फुलझाडे)
विविध फुलझाडे, त्यांची आद्यस्थान, लागवड, निगा आणि प्रत्येकाची रुपकळा अशा वैशिष्ट्यांचा या पुस्तकातून समृद्ध परिचय होतो. भारतातील वने, उपवने, उद्याने, गावे आणि शहरे येथील विलोभनीय वृक्षांचे, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत निरीक्षण करून ही वृक्षसोंदर्यांची गाथा लिहिलेली आहे. निसर्ग, लोपविणाऱ्या आजच्या महानगरी संस्कृतीत, नगर आणि वास्तुरचना शास्त्रज्ञ तसेच निसर्गविषयी आस्था बाळगणारे वाचक, या सर्वांनाच हे पुस्तक समयोचित वाटेल. या पुस्तकाचे लेखक के. डॉ. एम. एस. रंधावा यांनी विज्ञान, कला, आणि संस्कृती क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे. पहाडी पद्धतीच्या चित्रकलेवरील त्यांचे ग्रंथ अधिकृत मानले गेले आहेत. कृषि अनुसंधान परिपदेचे उपाध्यक्ष असतांना भारतातील शेतीबाबत तांत्रिक माहिती. देणारी, तसेच जनसामान्यांना उपयोगी अशी पुस्तके प्रकाशित करण्याच्या योजनेला त्यांनी चालना दिली. हे पुस्तक डॉ. रंधावा यांच्या प्रगाढ ज्ञानाचे आणि निसर्गप्रेमाचे उकृष्ट फलित आहे.
व्यंकटेश वकील यांनी या पुस्तकाचा समरसून अनुवाद केलेला आहे.
लेखक: एम. एस रंधावा
अनुवाद : व्यंकटेश वकील
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
