Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Poorvartika (पूर्वार्तिका)

Poorvartika (पूर्वार्तिका)

Regular price Rs.292.50
Regular price Rs.325.00 Sale price Rs.292.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Akash Balawante

Publisher: seagull publishing house

Pages: 192

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Poorvartika (पूर्वार्तिका)

'नात्याला नाव न मिळणं म्हणजे प्रेम संपणं नव्हे... कारण काही वेळा ते नियतीच्या वळणावर पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही म्हणून अधुरं राहतं! प्रेमाची अर्धवट राहिलेली गोष्ट जेव्हा नियती आणि विज्ञानाच्या अजब खेळाने एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबते!'
शाळेच्या बाकावर सुरू झालेली एक हळवी ओढ... कॉलेजात फुललेलं अव्यक्त प्रेम... आणि परिस्थितीच्या वादळात एकाकी पडलेली एक तमिळ ख्रिश्चन मुलगी, पूर्वा!
दुसऱ्या बाजूला, आयुष्याच्या उद्विग्न वळणावर जुन्या आठवणींचा भार वाहणारा राधेश, आणि त्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनून आलेली त्याची पत्नी, वर्तिका! सगळं काही सुरळीत सुरू असतानाच... एका क्षणात आयुष्याची वीण उसवते. नात्यांचे पदर विस्कटतात, विश्वास डळमळतो.
पण ही कथा केवळ एका जुन्या प्रेमाची किंवा पती-पत्नीच्या नात्यातल्या विश्वासाची नाही; ही आहे नियती आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीची कहाणी. ज्या प्रेमाचा शेवट कित्येक वर्षांपूर्वीच झाला होता, ती अपूर्ण कहाणी पूर्ण करण्यासाठी नियतीने विज्ञानाचा असा कोणता खेळ रचला होता?
एका प्रेमकथेपासून ते आजच्या काळातील ज्वलंत सामाजिक वास्तवाचा प्रवास घडवणारी, उत्कंठावर्धक आणि मनाला भिडणारी एक अद्भुत कादंबरी!
काही कहाण्यांचा शेवट हा केवळ पूर्णविराम नसतो, तर तो एका नवीन युगाचा आरंभ असतो.

लेखक: आकाश बळवंते 

View full details