Shulpaniche Adabhut Vishwa (शूलपाणीचे अदभुत विश्व)
Shulpaniche Adabhut Vishwa (शूलपाणीचे अदभुत विश्व)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शूलपाणी हे नर्मदेचे हृद्य आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण उन्हापासून डोक्याचे संरक्षण करायला सावलीलासुध्दा झाड नाही. येथे आहेत फक्त डोंगर. उघड्या नागड्या वैराण व एकांत डोंगरांचा अनंत विस्तार. दुर्गम रस्ता आणि भयानक निर्जनता. नर्मदेच्या प्रदक्षिणेतील हा सर्वात कठीण भाग आहे. यातून कोणीही परिक्रमावासी झाडी सोडतात, किंवा मग थंडीत जातात. उन्हाळ्यात खडक एवढे तापलेले. असतात, की त्यावरून अनवाणी चालणे अतिशय कष्टदायक असते. तहान लागते ती निराळीच. डोंगरामागून डोंगर, वळणामागून वळणे, दोंगरांच्या दाटीवाटीतून रस्ता शोधत निघालेली वेडीवाकडी अरूंद नर्मदा, ही आहे शूलपाणीची झाडी. निसर्गाने जणू नर्मदेच्या धाग्यात डोंगराचा गजरा गुंफायला घेतलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन प्रांतांच्या मिलनस्थळावर पसरलेल्या नर्मदेच्या या ऎंशी मैल लांबलचक विस्तीर्ण जागेला शूलपाणीची झाडी असे संबोधले जाते. झाडीतून परिक्रमावासी आईच्या पोटातून निघणार्या बाळासारखे निर्वस्त्र निघतात.
ISBN No. | :PRA0113 |
Author | :Sunil Pande |
Binding | :Paperback |
Pages | :304 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |