Akshardhara Book Gallery
Pravah Rhinecha (प्रवाह ऱ्हाईनचा)
Pravah Rhinecha (प्रवाह ऱ्हाईनचा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Siddhesh Aarti Shyam Vakil
Publisher: Sakal Prakashan
Pages: 160
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रवाह ऱ्हाईनचा
वेध जर्मन संस्कृतीचा
कधी एखाद्या प्रवासानं तुमचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे का? एखाद्या नव्या भूमीत पाऊल ठेवताक्षणी
तुमच्या मनात स्वत:ला नव्यानं ओळखण्याची एक कथा सुरू होते. या पुस्तकातही अगदी अशीच एक
कथा आहे. एक जिज्ञासू भारतीय तरुणी जगाचा अनुभव घेण्याच्या आणि स्वतःला घडवण्याच्या तयारीनं
जर्मनीसारख्या शांत, शिस्तबद्ध आणि विचारप्रधान देशात पोहोचते.
तिथं तिला असंख्य प्रश्न पडतात. इथली माणसं अशी का जगतात ? त्यांचा निसर्गाशी इतका स्नेह कसा?
शिस्त हा त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू कसा झाला असेल? या संस्कृतीतून मला काय नवं शिकता येईल?
या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधार्थ सुरू झालेल्या या प्रवासात ती अंतर्बाह्य बदलते. या पुस्तकातलं प्रत्येक
प्रकरण म्हणजे तिच्या प्रवासातला एक थांबा आहे. कधी जर्मनीच्या कुटुंबप्रणालीतली संवेदनशीलता,
कधी भोजनशैलीतला साधेपणा, तर कधी कला-संगीत-इतिहासातलं गूढ.
शहरांचे आवाज, ग्रामीण भागातली सकाळ, हिमवर्षावातली शांतता, ऑक्टोबरफेस्टचे रंग, ख्रिसमस
बाजारांची ओढ, लोकांच्या जीवनशैलीतला काटेकोरपणा, आर्थिक सामर्थ्य, शिक्षणातली पारदर्शकता
अशा सर्व पैलूंना हे पुस्तक स्पर्शकरतं...
हे पुस्तक वाचकाच्या विचारांना चालना देतं. लेखकानं या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाला वास्तवाचा
स्पर्श दिला आहे. हे पुस्तक केवळ 'जर्मनी' या देशाची सफर घडवत नाही, ते शांतपणे आपल्या मनात
घर करतं. तुम्हालाही स्वतःला नव्यानं अनुभवायचं असेल, तर हे पुस्तक त्यासाठी नक्की मदत करेल.
लेखक : सिद्धेश आरती श्याम वकील
