Punashcha Honeymoon ( पुनश्च हनिमून )
Punashcha Honeymoon ( पुनश्च हनिमून )
Share
Author:
Publisher:
Pages: 116
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पुनश्च हनिमून एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय, चाळिशीतील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या दोन तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकोळून टाकतात. हे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री-पुरुष लग्नसंबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भाव-विषता यांच्या रंगमंचीय खेळाचे गारूड नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्नसंसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडवडे आहेत. अशा नाटकाला सुरुवात असते, पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकानी आपापला समजून घ्यायचा असतो. - सतीश आळेकर
या पुस्तकाचे लेखक : संदेश कुलकर्णी , प्रकाशक : राजहंस प्रकाशन