Skip to product information
1 of 2

akshardhara

Vindanche Gadyaroop ( विंदांचे गद्यरुप )

Vindanche Gadyaroop ( विंदांचे गद्यरुप )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मराठीमध्ये वाड्मयाच्या सैध्दांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाड्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणार्‍या आणि वाड्मयकृतीच्या अस्तित्वाचा आनि तिच्या मूल्यमापनासंबंधीचे योग्य निकष देणार्‍या भूमिकेचा नव्याने शोध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दोनच प्रयत्न झाले. बा.सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिध्दांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाड्मयकला बाजूला काढणारा आणि वाड्मयकलेचे वेगळे स्वरूप अधोरेखित करणारा जीवनवेधी कले चा सिध्दांत मांडला. मराठीत जशी मर्ढेकरांच्या लयसिध्दांताची दखल घेतली गेली, तशी करंदीकरंच्या जीवनवेधी कलेच्या सिध्दांताची घेतली गेली नाही. किंबहूना त्यांच्या वाड्मयविषयक सैध्दांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकरांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिध्दांतच मांडला नाही, त्र त्यांनी हा सिध्दांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले.

Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :136
Language :Marathi
Edition :2022
View full details