Akshardhara Book Gallery
Rajvansh Bharati (राजवंश भारती)
Rajvansh Bharati (राजवंश भारती)
Share
Couldn't load pickup availability
Author: Adv. Sushil Atre
Publisher: Rajendra Prakashan
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
राजवंश भारती
'प्राचीन' हा शब्दही अपुरा वाटावा, इतका प्राचीन इतिहास आपल्या देशाचा आहे.
जगात बहुतेक ठिकाणी जेव्हा लोक रानटी टोळ्या म्हणून रहात होते, त्या काळी
भारतात समृद्ध आणि संपन्न राजघराणी राज्य करीत होती. त्या राजवंशांबद्दल फारच
थोडी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. जी आहे, ती पाश्चात्य अभ्यासकांच्या
ओंजळीतून मिळाली तरच स्वीकारायची अशी आपली मनोधारणा जी ब्रिटिशांनी
करून ठेवली, ती अजूनही संपत नाही. शालेय शिक्षणात या इतिहासाचा अगदी
ओझरता भाग शिकवला जातो. मोजके चिकित्सक विद्वान यावर जाडजूड शोधग्रंथ
लिहितात, पण ते इतके क्लिष्ट होतात की आजच्या पिढीतील मुले तसे ग्रंथ हातात
घेतच नाहीत. मग, आमचा देदीप्यमान इतिहास अज्ञानाच्या आणि उपेक्षेच्या
पडद्याआड तसाच दडलेला राहून जातो.
राजवंश भारती या पुस्तकात भारतातील निवडक अशा ५० श्रेष्ठ राजवंशांची थोडक्यात
आणि सचित्र माहिती दिली आहे आणि ती ही शक्य तितक्या सरळ-सोप्या भाषेत दिली
आहे; जेणेकरून अगदी शाळकरी मुलांनाही ती आपलीशी वाटावी.
आपल्या देशाविषयी सार्थ अन् साधार अभिमान नव्या पिढीला वाटावा, एवढाच उद्देश
या पुस्तकाचा आहे ! वन्दे मातरम् !!
लेखक : अॅड. सुशील अत्रे
