Akshardhara Book Gallery
Ramdasanchi Bhajane (रामदासांची भजने)
Ramdasanchi Bhajane (रामदासांची भजने)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vinoba
Publisher: Parandham Prakashan
Pages: 164
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ramdasanchi Bhajane (रामदासांची भजने)
'रामदासांनी लिहून तर पुष्कळ ठेवलें आहे. परंतु असार सोडून सार घ्यावें हें त्यांच्या सर्व लिखाणाचें सार आहे. किंबहुना ही त्यांची आज्ञा आहे. त्यांच्या ग्रंथांत दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन शिरोमणि ग्रंथ म्हणायचे.
दासबोधाचीं असंख्य पारायणें माझीं झाली, आणि मनाचे श्लोक तर मला पाठच होते. अनेक पारायणांनंतर दासबोधाचें जें मोजकें सार माझ्या हातात आलें तेवढें ‘बोध-बिंदु’ या नांवाने माझ्यासाठी मी निवडून ठेवलें होते. ‘मनाचे श्लोक' ही मात्र सोन्याची तिजोरीच आहे. दासबोध ही सोन्याची खाण म्हणावी लागेल. खाणींमध्ये अशोधित धातु पडलेला असतो. तो शोधून घ्यावा लागतो. तिजोरीत निखळ सोनें सांठविलेलें असतें. मनाचे श्लोक ही रामदासांची अपौरुषेय वाणी आहे. अन्य लिखाणांपैकी मुख्यतः त्यांच्या अभंगांची गाथा मी वारंवार घोळली आहे. तिचा एक सहज संग्रह माझ्या स्मृतीत सांठवला होता.
प्रस्तुत पुस्तकात आधी रामदासांचीं निवडक भजनें, त्यानंतर दासबोधातील बोध-बिंदु, आणि शेवटीं मनाचे श्लोक नांव दिलें आहे - सबंध घेतले आहेत. "
संपादक : विनोबा
