Akshardhara Book Gallery
Ranjak Goshti (रंजक गोष्टी)
Ranjak Goshti (रंजक गोष्टी)
Couldn't load pickup availability
Author: shanta shelke
Share
Publisher: jyotsna prakashan
Pages: 92
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
रंजक गोष्टी
कढयांमध्ये निरनिराळे धातू वितळत ठेवले होते. त्यांना पुरती उकळी फुटल्यावर तो लालभडक धगधगता रस अगदी भयंकर दिसत होता.
रस साच्यात ओतण्याची वेळ झाली. पुन्हा एकदा वादक आपली वाद्ये वाजवू लागले.
साचा जवळजवळ भरत आला शेवटी उरलेली सर्वांत मोठी कढई नोकरांनी उचलली आणि ते ती साच्यात ओतू लागले.
सर्वांच्या नजरा उकळत्या शेंदरी रसावर खिळल्या होत्या. इतक्यात नाजूक, लहानखुरी सुंदर ‘को-आई’ अचानक त्या साच्यांकडे धावली, धावता धावता ती म्हणाली,
‘‘बाबा, तुमच्यासाठी… तुमच्यासाठी करते आहे बरं मी हे… तुमच्यासाठी!’’
शांताबाईंनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने विविध प्रांतातल्या, प्रदेशांमधल्या तसंच परदेशांमधल्या गोष्टी देशी पद्धतीने सांगितल्या आहेत.
रसाळ व साध्या सोप्या भाषेमुळे या गोष्टी आपल्याशा वाटतात. पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घालतात.
लेखक. शान्ता ज. शेळके
प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन
