Akshardhara Book Gallery
Ranjhunjar (रणझुंजार)
Ranjhunjar (रणझुंजार)
Couldn't load pickup availability
Author: Pratap Gangavane
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 199
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शिवस्वराज्यातील मावळ्यांचा रोमहर्षक शौर्यकथा
रणझुंजार
या पुस्तकाच्या पानोपानी तुम्हाला रांगड्या सह्याद्रीचा साक्षात्कार होईल. प्रत्येक ओळीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या तेजाळ खुणा दिसतील. मजकुरातून देखण्या नागाची सळसळ जाणवेल, बहिरी ससाण्याच्या भेदक नजरेतून अफाट शौर्याचा अनुभन येईल. शब्दाशब्दांतून स्वराज्यप्रेमाचा रसरशीत स्फुलिंग दिसेल. काळ्या कातळावरचा अज्ञात रक्ताचा सपकारा मनाला अस्वस्थ करेल, भाबड्या मावळ्यांचं निस्सीम शिवप्रेम अंतःकरणाला पाझर फोडेल. ही आहे झुंजार मावळ्यांच्या पराक्रमांची, जिद्दीची, अखंड जयमाला. हे त्या तलवारींचे स्मरण आहे, ज्यांच्या धारेने बलाढ्य बादशाही गर्वाचा चुराडा केला. ही त्या शेता-बांधावरच्या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाची अमरकहाणी आहे. ज्यांनी आपल्या निष्ठावंत रक्ताने स्वराज्याचा जाज्वल इतिहास रचला, त्या सार्वभौम स्वराज्याच्या रोमहर्षक, प्रेरणादायी, शौर्यकथांची ही यशोगाथा..
लेखक : प्रताप गंगावणे
प्रकाशक : साकेत प्रकाशन
