Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

RASACHANDRIKA (रसचंद्रिका)

RASACHANDRIKA (रसचंद्रिका)

Regular price Rs.427.50
Regular price Rs.475.00 Sale price Rs.427.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: SARASWAT MAHILA SAMAJ

Publisher: POPULAR PRAKASHAN

Pages: 236

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:---

रसचंद्रिका

संग्राहक : सारस्वत महिला समाज
उत्तम स्वयंपाक करता येणे ही एक कला आहे. आजच्या स्वावलंबी युगात प्रत्येक स्त्रीला किंबहुना पुरुष-वर्गालासुद्धा या कलेचे ज्ञान असणे अत्यंत जरुरीचे आहे. ही कला आवश्यक असली तरी हिचे ज्ञान घरीच मिळत असल्यामुळे तिच्याबद्दल जेवढे महत्त्व वाटायला पाहिजे तेवढे वाटत नाही, म्हणून आपल्या मुलामुलींना इतर विद्या व कला यांचे शिक्षण देण्याकडे आपला जेवढा कल आहे, तेवढा या कलेकडे नाही.
सारस्वत महिला समाज या संस्थेने १९४३ साली अंबाबाई संशी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्या भगिनींसाठी चित्रापूर सारस्वत पद्धतीच्या स्वयंपाकातील पदार्थांचे 'रसचंद्रिका' हे पुस्तक तयार केले. रोजच्या आहारात आवश्यक असलेल्या पदार्थघटकांचे प्रमाण, स्वयंपाकास सुरुवात करण्याअगोदरची पूर्वतयारी ते त्या-त्या पदार्थाकरिता लागणारी आवश्यक ती साहित्यसामग्री, त्यांचे प्रमाण-कृती, वेगवेगळी मापे व मापनपद्धती हे सारे तपशिलवार या पुस्तकात दिले आहे.
'रसचंद्रिका' हे पुस्तक सारस्वत समाजाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख तर करून देतेच; शिवाय वर्षभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण-उत्सवांची आणि त्या त्या दिवशी करायच्या पारंपरिक स्वयंपाकाची माहितीही देते.
बारीकसारीक आजारांवरची घरगुती औषधे आणि नवजात बाळांची काळजी कशी घ्यावी याबद्दलची माहितीही या पुस्तकात दिली आहे.

लेखक : सारस्वत महिला समाज 
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन 

View full details