Mulansathi Pather Panchali ( मुलांसाठी पथेर पांचाली )
Mulansathi Pather Panchali ( मुलांसाठी पथेर पांचाली )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पथेर पांचाली ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी १९२९ मध्ये लिहिली, ती प्रचंड लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांनी स्वत:च त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र्य आवृत्ती १९४२ मध्ये काढली, तिला त्यांनी आंब्याच्या कोयीची पुंगी असे नाव दिले. त्या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षे वयाच्या तरूण चित्रकाराकडे सोपवले गेले. त्याचे नाव सत्यजित राय. त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी रूतून बसली की, त्यानंतर बारा वर्षांनी त्याने एक चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले तेव्हा ती कथा निवडली. १९५५ मध्ये आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत माईल्स्टोन ठरला. परिणामी पथेर पांचाली ही कादंबरी आणखी चर्चिली गेली, वेगेवगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगालीमध्ये प्रचंड लोकप्रिय असूनही अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही. आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तीसुध्दा सत्यजित राय यांनी बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह..!
Author | :Vibhutibhushan Bandyopadhyay |
Publisher | :Sadhana Prakashan |
Translator | :Vijay Padalkar |
Binding | :Paperback |
Pages | :103 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |