Talking Politics ( टॉकिंग पॉलिटिक्स )
Talking Politics ( टॉकिंग पॉलिटिक्स )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एक तत्त्वज्ञ म्हणून भिखू पारेख यांनी आपली उभी ह्यात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यात घालवली, कारण तत्त्वज्ञानाचा अर्थच तो असतो. आपल्या तत्त्वज्ञानाबाबत आणि तात्विक भूमिकांबद्दल ते नेहमीच दृढ आणि सुसंगत राहत आले आहेत, हे त्यांचा जीवनप्रवास पाहिलेल्यांना पुरेपुर माहीत आहे. आयुष्याची पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी समानतेबाबतच्या तत्तचिंतनासाठी आणि समानतेसाठीच्या प्रत्यक्ष लढ्यासाठी वेचली आहेत. तात्विक दृष्ट्या गहन आणि नैतिक दृष्ट्या बांधिलकी मांडणार्या त्यांच्या चिंतनाची व्यापक पातळीवर प्रशंसा झालेली आहे आणि हे चिंतन मूलगामी स्वरूपाचे आहे, असे मानले गेले आहे. त्यांच्या आयुष्याची आणि विचारांची ओळख करून देणारे हे संवादरुपी पुस्तक म्हणजे, माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराची निशाणी आहे. त्यांचा वैचारिक वारसा असे या पुस्तकाबाबत बोलणे अकाली होईल, पण कल्पनाही करता येणार नाही इतक्या नैतिक व राजकीय शक्यतांचा पट त्यांनी इथे उघड केला आहे.
Author | :Bhikhu Parekh |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |