Sadhuputra Shambhu ( साधूपुत्र शंभू )
Sadhuputra Shambhu ( साधूपुत्र शंभू )
Share
Author:
Publisher:
Pages: 360
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वत: अग्नी दिला.'
शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिंवत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढेच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन- दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्याने शंभूराजांच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धुळदाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले. कसे ? उत्तर हेचि #शंभू
या पुस्तकाचे लेखक : नितीन अरुण थोरात , प्रकाशक : रायटर पब्लिकेशन