Akshardhara Book Gallery
Sahityavedh (साहित्यवेध)
Sahityavedh (साहित्यवेध)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Janardan Waghmare
Share
Publisher: Scion Publication
Pages: 239
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
साहित्यवेध
शब्दाशिवाय मानवी जीवनाला आशय आणि अर्थ प्राप्त होत नाही. शेवटी शब्दब्रह्मानेच हे विश्व पूर्णपणे व्यापलेले आहे. शब्दामुळेच जीवनाला चैतन्य प्राप्त होते. प्रत्येक अभिजात शब्द म्हणजे उपनिषद् ! त्यात काव्यही असते आणि तत्त्वज्ञानही. अभिजात काव्यात तत्त्वज्ञान हे असतेच. तत्त्वज्ञान म्हणजे काव्याचा आशय ! काव्य म्हणजे तत्त्वज्ञानाचा आरसा ! साहित्याचे तत्त्वज्ञान समजून घ्यावयाचे असेल तर आधी तत्त्वज्ञान म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. माणूस हा विचार करणारा सामाजिक प्राणी आहे. विचार करण्याची शक्ती फक्त माणसालाच निसर्गाने दिलेली आहे. त्याला बुद्धी लाभल्यामुळे तो विचार करतो. 'मी विचार करतो, म्हणून मी आहे' अशी तो स्वतःची ओळख करून देतो. 'मी आहे' या बिंदूपासूनच खरेतर तत्त्वज्ञान सुरू होते. माणसाचे अस्तित्व हाच तत्त्वज्ञानाचा आरंभबिंदू आहे, पण त्याच्या अस्तित्वाला दोन संदर्भ आहेत : एक मानवी समाज आणि दुसरा निसर्ग. माणूस, त्याचा मानवी समाज व निसर्ग या त्रिकोणातले वास्तव हाच तत्त्वज्ञानाचा विषय आहे. हेच वास्तव साहित्यामध्ये प्रतिबिंबित होते. साहित्य हा आरसा आहे. त्याच्या समोर जे जे येते, ते ते त्यात प्रतिबिंबित होते. थोडक्यात साहित्य म्हणजे माणूस, मानवी समाज व निसर्ग यांचे प्रतिबिंब. साहित्य म्हणजे मूळ वस्तू नव्हे. मूळ वस्तू म्हणजे माणूस, समाज आणि त्याच्या अवतीभवतीचा निसर्ग. या तिन्ही घटकांचे प्रतिबिंब म्हणजे साहित्य. 'साहित्यवेध' या लेखसंग्रहातील लेख काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्यातील अनुबंध आपल्या लक्षात आणून देतात.
प्रकाशक. सायन पब्लिकेशन
लेखक. जनार्दन वाघमारे
